आमच्याबद्दल

“Ideas are no one’s monopoly. It is all about execution.”

माझी गोष्ट:

पदवीने चार्टर्ड अकाउंटंट असले तरी, पहिल्यापासूनच मला शिकवण्याची आवड होती. सुरुवातीला फायनान्स संबंधित विषय जेव्हा शिकवले, तेव्हा स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांसोबत वाटण्याची आवड माझ्यात निर्माण झाली.

२०१९ मध्ये मी YouTube वर पहिला व्हिडिओ प्रसारित केला आणि YouTube चा प्रवास सुरु झाला. काहीच आठवड्यांमध्ये तो व्हिडिओ सुप्रसिद्ध झाला. लोकांना आपला व्हिडिओ आवडला आहे आणि लोकांना त्यातून ज्ञान मिळतंय हे समजल्यावर माझा आत्मविश्वास वाढला आणि आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळाली. YouTube वरच्या व्हिडिओ द्वारे मी माझी शिकवण्याची आवड जोपासत आहे.

YouTube द्वारे लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवणे हे माझे मुख्य ध्येय आहे. माझ्या व्हिडिओद्वारे लोकांना आर्थिक ज्ञान मिळेल व ते माहितीपूर्वक निर्णय घेतील हीच आशा करते.

 

ध्येय:

माझ्या समोर येत्या वर्षासाठी २ ध्येय आहेत:

पाहिलं म्हणजे माझा ब्रँड स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करायचं आणि दुसरं म्हणजे जागतिक पातळीवर प्रसिद्ध करायचं. स्थानिक पातळीवर मराठी चॅनेल द्वारे काम चालू आहे. मराठी चॅनेल ला पहिल्याच वर्षात ५ लाख पेक्षा जास्त सबस्क्राइबर आहेत. जागतिक पातळीवर मला "1 बिलियन समिट इन दुबई, अबू धाबी आणि मस्कट चे ICAI कार्यालय आणि Google च्या कॅलिफोर्निया मधील कार्यालयात बोलण्याची संधी मिळाली.

 

आम्ही काय करतो?

स्टॉक मार्केट आणि फायनान्सच्या संकल्पना सोप्या भाषेत शिकवून, लोकांची आर्थिक साक्षरता वाढवणे, ह्या एकाच उद्देशाने आम्ही काम करतो. तुम्ही नवखे गुंतवणूकदार असाल किंवा अनुभवी असाल, आमच्या वेबसाईट वर सर्वांसाठीच कोर्सेस उपलब्ध आहेत.

Beginner Intermediate आणि Final अश्या ३ स्तरांमध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत. Basics of Stock Market, Fundamental Analysis, Technical Analysis, Future  & Options अशा विविध विषयांवरती कोर्सेस उपलब्ध आहेत.

ह्या कोर्सेस द्वारे तुम्ही अवघड संकल्पना अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीने शिकू शकता. कोर्सेस च्या शेवटी तुमचं ज्ञान आणखी वाढावं म्हणून परीक्षा दिल्या आहेत. ह्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल जे प्रमाणपत्र मिळेल ते तुम्ही social media वर मिरवू शकता.

तर मग वाट कसली बघताय?

आजच कोर्स सुरु करा आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा.    


नोंद: या वेबसाइटवरील सर्व कोर्सेस केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे स्टॉक टिप किंवा सल्ला प्रदान करत नाही.